E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री
Wrutuja pandharpure
14 May 2025
ओटावा
: भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी मंगळवारी कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. कॅनडामध्ये २८ एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. लिबरल पार्टी आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांचा विजय झाला. या निवडणुकीत भारतीय वंशाचे २२ उमेदवार विजयी झाले.
अनिता व्यतिरिक्त, मार्क कार्ने यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे तीन लोक आहेत. त्यापैकी मनिंदर सिंधू यांना आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. सिंधू या यापूर्वी परराष्ट्र मंत्री होत्या. २०१९ पासून त्या सतत निवडणुका जिंकत आहेत.याशिवाय रुबी सहोता आणि रणदीप सिंग सराई यांना राज्य सचिव बनवण्यात आले आहे.
अनिता आनंद यांनी मिळवला २०१९ मध्ये पहिला विजय
५८ वर्षीय अनिता व्यवसायाने वकील आहेत. २०१९ मध्ये त्यांनी कॅनडाच्या ओकव्हिल मतदारसंघातून पहिली संसदीय निवडणूक जिंकली.अनिता आनंद यांनी यापूर्वी कॅनडाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले आहे. २०२१ मध्ये माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्याच वर्षी त्या कॅबिनेट मंत्री झाल्यावर त्यांच्याकडे सार्वजनिक सेवा आणि खरेदी या खात्यांची जवाबदारी होती.
अनिता या कॅनडाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. यापूर्वी १९९० मध्ये किम कॅम्पबेल यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.अनिता आनंद या लिंग समानतेच्या एक समर्थक आहेत. त्या LGBTQIA+ अधिकारांना समर्थन देते. त्यांनी लैंगिक गैरवर्तनाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि कॅनेडियन संरक्षण दलांमध्ये सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला.
अनिता आनंद व्यवसायाने वकील
अनिता आनंद या भारतीय वंशाच्या आहेत. अनिताचे वडील तामिळनाडूचे होते तर आई पंजाबची होती.अनिता यांचा जन्म आणि वाढ कॅनडाच्या ग्रामीण भागात असलेल्या नोव्हा स्कॉशियामध्ये झाली.५७ वर्षीय अनिता व्यवसायाने वकील आहेत.अनिता टोरंटो विद्यापीठाच्या असोसिएट डीन देखील राहिल्या आहेत. १९९५ मध्ये त्यांनी कॅनेडियन वकील आणि व्यवसाय कार्यकारी जॉन नॉल्टन यांच्याशी लग्न केले. अनिता आनंद याना ४ मुले आहेत.
Related
Articles
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटीबाबत निवेदन
29 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरूचा संघ सज्ज
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
5
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
6
वाचक लिहितात